❤️ माणुसकीचा अनोखा उपक्रम…! वंचित मुलांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद! ❤️
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या शासकीय निवासस्थानी सानिका धिवरे आणि अर्णव श्रीकांत धिवरे यांच्या पुढाकारातून एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
डंपिंग ग्राउंड परिसरात राहणाऱ्या तसेच कचरा वेचून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या वंचित कुटुंबांतील लहान मुलांना यावेळी शासकीय निवासस्थानी स्नेहपूर्वक आमंत्रित करण्यात आले.
याप्रसंगी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वतः मुलांशी संवाद साधत त्यांच्या शिक्षणाबाबत, कौटुंबिक परिस्थितीबाबत आणि स्वप्नांबाबत आस्थेने विचारपूस केली. तसेच मुलांना नवीन कपडे, शूज आणि मिठाईचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविला.
केवळ मदतीचा हात नव्हे, तर वंचित बालकांच्या स्वप्नांना बळ देणारा हा संवेदनशील उपक्रम समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
माणुसकी, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश देणारा हा उपक्रम!
जळगाव जिल्हा पोलीस 🚔
Jalgaon, Maharashtra | Nov 11, 2026