रामटेक: रामटेक शहरात चोरांचा हौदोस ; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Ramtek, Nagpur | May 9, 2026 रामटेक शहरातील दोन मेडिकल शॉप व एका घरी अज्ञात चोरांनी शुक्रवार दिनांक 8 मे च्या रात्री ते शनिवार दिनांक 9 मे च्या सकाळी चार वाजता पर्यंतच्या दरम्यान पराग मेडिकल शॉप, आस्था मेडिकल शॉप व अनिल नान्हे यांच्या घरी चोरी करून एकूण पंधरा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पोलीस हवालदार शैलेंद्र रामटेके पेट्रोलिंग करीत असताना शनिवारच्या सकाळी चार वाजता च्या दरम्यान त्यांना ही बाब लक्षात आली.