रामटेक: मसला शिवारात दोन ट्रकच्या भीषण धडकेत एक ट्रक पेटला तर दुसरा पलटला; तिघे गंभीर जख्मी
Ramtek, Nagpur | Jun 17, 2026 रामटेक - भंडारा मार्गावरील मसला गाव शिवारात आमोरासमोर आलेल्या दोन ट्रकमध्ये भीषण धडक बसली. यात एका ट्रकने पेट घेतला. तर दुसरा ट्रक मार्गावरच पलटला. ही घटना बुधवार दिनांक 17 जूनला सकाळी घडली. यात तिघेजण गंभीर जखमी झाले असून तिघांनाही मेडिकल हॉस्पिटल नागपूर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.