रामटेक: शेतकऱ्यांना15 दिवसात बोनस द्या; अन्यथा राज्य सरकारला काँग्रेसधारेवर धरणार
- माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांचा इशारा
Ramtek, Nagpur | Jul 13, 2026 राज्य शासनाने मागच्या हंगामात धानाला बोनस देऊ अशी वल्गना केली होती. परंतु हे आर्थिक वर्ष संपूणही अजून पर्यंत शेतकऱ्यांच्या हाती बोनस लागलेला नाही. आगामी 15 दिवसात जर 50 हजार रु.बोनस मिळाला नाही तर मोठ्या संख्येने धान उत्पादक शेतकरी आंदोलन करतील व सरकारला धारेवर धरतील असा इशारा माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी 13 जुलैला दुपारी दीड वाजताच्या दरम्यान एसडीओ कार्यालय रामटेक येथे दिला. त्यांनी या मागणीचे निवेदन एसडीओ रामटेक यांना सोपविले.