रामटेक: अंबाळा जलाशय येथे गंगा दशहरा महोत्सव उत्साहात संपन्न
Ramtek, Nagpur | May 25, 2026 रामटेक शहरा जवळील अंबाळा जलाशय तीर्थस्थळ येथे सोमवार दिनांक 25 मे ला सायंकाळी सात वाजता पासून गंगा दहशरा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भारतीय जनसेवा मंडळ रामटेक व नागरिकांच्या संयुक्त विद्यमाने मागील काही वर्षांपासून येथे आयोजन करण्यात येते. सायंकाळी सात वाजता येथे महाआरती करण्यात आली. महाप्रसादाने महोत्सवाचे समापन झाले.