रामटेक: देवलापार येथील एका फार्म हाऊस वर अजगराने गिळल्या दोन कोंबड्या
Ramtek, Nagpur | Jul 25, 2026 शनिवार दिनांक 25 जुलैला देवलापार येथील मोहम्मद अली फार्म हाऊस वर एका अजगराने धुमाकूळ घालीत दोन कोंबड्या फस्त केल्या. हा प्रकार लक्षात येताच स्थानिक सर्पमित्र अंकित मरसकोल्हे याला तात्काळ घटनास्थळी बोलवण्यात आले.त्याने अजगराचा रेस्क्यू केला. अजगराने काय खाल्ले असावे असा कयास लावला जात असतानाच अजगराने एकामागून एक दोन कोंबड्या तोंडातून बाहेर काढल्या.