बोगस वैद्यकीय व्यावसायिकांवर आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याकरिता जिल्हा दंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची सभा संपन्न
49 views | Sindhudurg, Maharashtra | Apr 24, 2026 बोगस वैद्यकीय व्यावसायिकांवर आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याकरिता जिल्हा दंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची सभा आज दि. 23 एप्रिल 2026 रोजी स.11 वा. माननीय जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचे दालनात घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी,जिल्हा पोलीस उपाधीक्षक सिंधुदुर्ग, तसेच पोलीस निरीक्षक, मानवाधिकार प्रतिनिधी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतिनिधी, पोलीस अधिकारी, सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.जिल्ह्यामध्ये बोगस वैद्यकीय व्यवसाय कोण करत असतील तर त्यांचेवर कारवाई करणे करिता जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार करणेचे ठरले.