नागपूर ग्रामीण: पहिल्याच दिवशी धोकादायक काम भोवले; क्रेनच्या बेल्टमध्ये हात अडकल्याने तरुणाचा दुर्दैवी अंत, चार महिन्याचे बाळ पोरके
निको हेवी इंजिनिअरिंग कास्टिंग लिमिटेड या कारखान्यात 14 सप्टेंबरला सकाळी एक अत्यंत दुर्दैवी आणि हादरवून टाकणारी घटना घडली. वाळू मिक्स करून वर चढविणाऱ्या क्रेनच्या कनवेअर बेल्टमध्ये हात सापडल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात ३० वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला.रोहित रामदुलार चौबे असे मृत कामगाराचे नाव आहे. या दुर्घटनेमुळे कामगार वर्गात आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास निको हेवी इंजिनिअरिंग कारखान्यात ही घटना घडली.रोहित हा कारखान्यात सकाळी नेहमीप्रमाणे कामावर गेला.