नागपूर ग्रामीण: हिंगणात खळबळ! चिमुकलीला पळवण्याचा प्रयत्न; महिलेला पोलिसांनी घेतले ताब्यात, तपास सुरू
*हिंगणात खळबळ! चिमुकलीला पळवण्याचा प्रयत्न; महिलेला पोलिसांनी घेतले ताब्यात, तपास सुरू* हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील रायपूर (हिंगणा) येथील नेहरू विद्यालय परिसरात चार वर्षांच्या चिमुकलीला पोत्यात टाकून नेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंदाजे ५०ते ५५ वर्षांच्या महिलेने ही मुलगी बहला-फुसलावून नेण्याचा प्रयत्न केल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच नागरिकांनी तत्काळ हस्तक्षेप करून मुलीची सुटका केली.