नागपूर ग्रामीण: वाडी टी पॉईंट येथे एटीएम मशीन मध्ये लोखंडी पट्टी लावून पैसे चोरणारे गजाआड
,एटीएम मशिनच्या कॅश एक्झिट स्लॉटमध्ये लोखंडी पट्टी अडकवून पैसे चोरणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी प्रणय रामदास वानखेडे याला अटक करण्यात आली असून, त्याच्यासोबत असलेल्या एका विधीसंघर्ष बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे.वाडी टी-पॉईंट येथील हिताची एटीएममध्ये जितेंद्र भगत हे ७,००० रुपये काढण्यासाठी गेले असता, पैसे निघाल्याचा आवाज आला पण रोकड बाहेर आली नाही.