अलिबाग: रायगडात ३८० न्यायालयीन कर्मचारी सुधारित वेतनश्रेणीसाठी बेमुदत संपावर
Alibag, Raigad | Nov 17, 2026 रायगडात ३८० न्यायालयीन कर्मचारी आजपासून सुधारित वेतनश्रेणी मागणीसाठी बेमुदत संपावर गेले आहेत. या संपामुळे न्यायालयीन कामकाजावर परिणाम झाला आहे. राज्यातील ३४ हजार दुय्यम न्यायालयीन कर्मचारीही या आंदोलनाचा भाग आहेत. शासनाकडून अद्याप निर्णय नाही.