पिशोर येथे अंबादास दादा दानवे (माजी विरोधी पक्षनेते व शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख) यांच्या उपस्थितीत कुंजखेडा, पिशोर आणि नाचनवेल जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस माजी आमदार उदयसिंग राजपूत, तालुकाप्रमुख, उपतालुका प्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख तसेच सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीत आगामी निवडणुकीचे नियोजन, रणनिती आखणी, बूथनिहाय संघटन बांधणी आणि कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्यांवर सविस्तर चर्चा झाली.