अंबरनाथ: भारतीय सैन्याच मनोबल वाढवण्यासाठी बदलापूर मध्ये महाविकास आघाडीच्या वतीने महालक्ष्मी मंदिरात महाआरती
आज दिनांक 10 मे रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास बदलापूर मध्ये महाविकास आघाडीच्या वतीने महालक्ष्मी मंदिरामध्ये महाआरती केली आहे. महाआरतीच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भारतीय सैन्याचं मनोबल वाढव अशी मागणी केली आहे. तसेच भारताला युद्धामध्ये यश यावं अस साकडे देवीकडे घातल आहे.