अंबरनाथ: बदलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे होणार मॉक ड्रिल
केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्यासाठी “ऑपरेशन अभ्यास” या मॉक ड्रिलचे आयोजन बदलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे आज दि.9 मे रोजी दुपारी 4 वा करण्यात आले आहे अशी माहिती ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आज दि 9 मे रोजी दुपारी 12 च्या सुमारास एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.