Akot:नंदीपेठ, सोमवार वेस,सोनू चौक यासह विविध ठिकाणी पोळा सण उत्साहात साजरा
Balapur, Akola | Sep 10, 2026 शहरातील नंदीपेठ सोमवार वेस सोनू चौक रामटेक पुरा खानापूर वेस यासह विविध ठिकाणी पोळा साजरा झाला यावेळी सोमवार वेस नंदीपेठ परिसरातील पोळ्यात आकर्षक झुली व सजावट केलेल्या बैल जोड्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तर पोळा फुटल्यानंतर घरोघरी या बैलजोड्यांची पूजन करण्यात आले शेतकऱ्यांनी यावेळी वृषभ राजाचे पूजन करून त्याच्या विषयीची कृतज्ञता व्यक्त केली.पोळ्यासाठी शहर पोलिसांनी ठिकठिकाणी तगडा बंदोबस्त ठेवला होता.