नरखेड: नरखेडमध्ये वाहन चोरीचा गुन्हा उघड; न्यायालय परिसरातून वाहन चोरी करणाऱ्या आरोपीला अटक
Narkhed, Nagpur | May 13, 2026 नागपूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने नरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या प्रकरणी नितेश एकनाथ उईके या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.तांत्रिक पुराव्यांच्या आधारे काटोल येथील गळपुरा चौकातून आरोपीला अटक करण्यात आली.आरोपीने २० एप्रिल रोजी नरखेड न्यायालयाच्या परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. ३०,००० रुपये किमतीची 'पॅशन प्रो' दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे.