महाराष्ट्र विधिमंडळाची हिवाळी अधिवेशन सोमवार आठ ते रविवार 14 डिसेंबर या कालावधीत नागपूर मध्ये होणार आहे. दिनांक 13 डिसेंबर शनिवार आणि 14 डिसेंबर रविवार शासकीय सुट्ट्याच्या दिवशी ही दोन्ही सभागृहाचे कामकाज घेण्याचा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चालू आहेत त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाची आचारसंहिता 21 डिसेंबर पर्यंत लागू राहणार आहे.