रामटेक: खुमारी येथे जागतिक व्याघ्र दिन उत्साहात साजरा
Ramtek, Nagpur | Jul 29, 2026 जागतिक व्याघ्र दिनानिमित्त 29 जुलैला तालुक्यातील पुण्यश्लोक विद्यानिकेतन शाळा खुमारी येथे विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूरचे उपसंचालक अक्षय गजभिये,सहाय्यक वनसंरक्षक कुमारी पूजा लिंबगावकर, वनपरिक्षेत्राधिकारी जयेश तायडे चोरबावली वन्यजीव यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.