रोहा: मध्य रेल्वेची १४ दशलक्ष टन मालवाहतूक
Roha, Raigad | Jun 12, 2026 मध्य रेल्वेने एप्रिल ते मे २०२६ या कालावधीत ५३८७ रॅकद्वारे १४.१३ दशलक्ष टन मालवाहतुक केली आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ५०४७ रॅकद्वारे १३.५७ दशलक्ष टन मालवाहतूक झाली होती; त्या तुलनेत टनभारामध्ये ४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत एप्रिल-मे २०२६ मध्ये रॅकच्या संख्येत ३४० रॅकची वाढ झाली आहे. एप्रिल ते मे २०२६ या कालावधीत मालवाहतुकीतून एकूण १४४२.५१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले.