नागपूर शहर: नागपुरात धक्कादायक प्रकार: फोन उचलत नाही म्हणून घरी गेलेल्या पत्नीला पती गॅलरित मृत अवस्थेत आढळला
सोनेगाव पोलीस ठाणे हद्दीतील उज्ज्वल नगर परिसरातील मुळीक कॉम्प्लेक्समध्ये एका ३४ वर्षीय तरुणाचा संशयास्पद व दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. प्रतीक पुरुषोत्तम बारसिंगे असे मृत तरुणाचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार, २४ ऑगस्ट रोजी सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास प्रतीक यांच्या पत्नीने त्यांना वारंवार फोन केला होता.मात्र, त्यांनी फोनचे उत्तर दिले नाही. चिंता वाटल्यामुळे त्या आपल्या आईच्या घरून स्वतःच्या घरी आल्या.