हवेली: पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोड येथील रंगला पंजाब रेस्टॉरंटजवळील प्राइम स्क्वेअर मॉलमध्ये भीषण आग लागली.
Haveli, Pune | Dec 1, 2025 पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोड येथील रंगला पंजाब रेस्टॉरंटजवळील प्राइम स्क्वेअर मॉलमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग नेमकी कोणत्या कारणाने लागली ते कारण अध्याप समजू शकले नाही. या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवीत हानी व कोणाला इजा पोहचली याची माहिती मिळाली नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या वतीने आग विझविण्याचे काम करण्यात आली.