जालना: जालना शहरात श्री संत गजानन महाराज पालखीचे आगमन; अंबड रोडवर भाविकांकडून जंगी स्वागत
Jalna, Jalna | Aug 9, 2026 श्री संत गजानन महाराज पालखीचे रविवारी (दि. 9 ऑगस्ट) जालना शहरात आगमन झाले. पालखीच्या आगमनानिमित्त अंबड रोड परिसरात भाविकांनी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहत भक्तिभावाने पालखीचे स्वागत केले. विविध ठिकाणी करण्यात आलेल्या स्वागतामुळे अंबड रोड परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. रविवारी दुपारी 1 वाजता अंबड रोडवरील पाण्याची टाकी, मातोश्री लॉन्स, नंदनवन कॉलनी, पांगारकर नगर तसेच अंबड चौफुली परिसरात पालखीचे आगमन झाले. पालखीचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.