नरखेड: धक्कादायक!नरखेडमध्ये 12 वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न; ६० वर्षीय दुकानदाराला अटक
नरखेड शहरातील पेठ विभागात एका १२ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी ६० वर्षीय दुकानदाराला पोलिसांनी अटक केली आहे.अटकेतील आरोपीचे नाव चंद्रकांचन उर्फ बंडू कोरडे (वय ६० वर्ष) असे सांगण्यात आले आहे. पीडित मुलगी दुपारच्या सुमारास आरोपीच्या दुकानात शीतपेय घेण्यासाठी गेली होती. परिसरात वर्दळ नसल्याची संधी साधून आरोपीने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला