🚨 आरोग्य विभागाचा मोठा निर्णय! नवीन प्रशिक्षण धोरण जाहीर
1.2k views | Nanded, Maharashtra | Aug 22, 2026 राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा दर्जा सुधारण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण प्रणालीत मोठे बदल करण्यात आले आहेत. पदोन्नतीसाठी प्रशिक्षण अनिवार्य: नवीन कर्मचाऱ्यांसह पदोन्नतीसाठी आणि सेवेच्या ठरावीक कालावधीनंतर प्रशिक्षण पूर्ण करणे सक्तीचे. प्रत्यक्ष कौशल्य विकास: कर्मचाऱ्यांसाठी २८ दिवसांचे निवासी 'स्किल लॅब' प्रशिक्षण (२० दिवस लॅब सराव + ८ दिवस जिल्हा रुग्णालयात प्रत्यक्ष अनुभव). नोडल संस्था: नागपूरची राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण संस्था (SIHFW) मुख्य केंद्र म्हणून काम पाहणार. #HealthDepartment #MaharashtraNews #ArogyaVibhag #NandedNews #PublicApp