जालना: ‘हर घर तिरंगा’ आणि विभाजन विभीषिका स्मृती दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन : जिल्हाधिकारीजिल्हाधिकारी अशिमा मित्तल
Jalna, Jalna | Aug 11, 2026 जालना जिल्ह्यात ‘घरोघरी तिरंगा’ (हर घर तिरंगा) मोहिमे अंतर्गत 9 ते 17 ऑगस्ट, 2026 या कालावधीत तसेच 13 ऑगस्ट 2026 पासुन विभाजन विभीषिका स्मृती दिनानिमित्त विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी मंगळवार दि. 11 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषदेत दिली. ‘घरोघरी तिरंगा’ (हर घर तिरंगा) मोहिमे निमित्ताने जिल्ह्यात दि. 12 ऑगस्ट 2026 रोजी तिरंगा पदयात्रा, व्याख्यान आणि चर्चासत्राचे आयोजन करुन विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.