गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमरावती ग्रामीण पोलिसांचे पाऊल! 🚨🛡️
वरूड येथे माननीय पोलीस अधीक्षक श्री. निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी गणेशोत्सव अत्यंत शांततापूर्ण, सुरक्षित आणि सुव्यवस्थित वातावरणात पार पाडण्यासाठी 'शांतता समितीची बैठक' पार पडली. या बैठकीत नागरिक आणि व्यापारी वर्गाशी संवाद साधत सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. 🤝
तसेच, वरूड शहरात पोलिसांमार्फत रूट मार्च काढण्यात येऊन बाजारपेठेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले आणि केदार चौक येथे नॉइज लेव्हल मीटरद्वारे ध्वनी प्रदूषणाची नोंद घेत पंचनामा करण्याची कारवाई करण्यात आली. 📢👮♂️
☎️ आपत्कालीन मदत हवी आहे का?
संपर्क करा:
• पोलीस हेल्पलाइन: 112
• सायबर हेल्पलाइन: 1930
#AmravatiRuralPolice
#OperationKavach
#Warud
#Ganeshotsav2026
#PublicSafety
Follow us all Official links are in bio🔗
1.7k views | Amravati, Maharashtra | Sep 13, 2026