रोहा: कोकणचा विकास हा महाराष्ट्राच्या विकासाचा कणा आहे : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
Roha, Raigad | May 12, 2026 रायगड म्हणजे केवळ जिल्हा नाही तर रायगड शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेली पवित्र भूमी आहे. स्वराज्याला राजा देणारी ही भूमी आहे. त्यामुळे ही प्रत्येक मराठी माणसाची प्रेरणा आणि अस्मिता असलेली भूमी आहे. याच रायगड जिल्ह्यामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. आणि सामाजिक समतेचा एक नवा इतिहास लिहिला. असे उदगार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काढले. त्या रोहा अष्टमी नगरपरिषदेतील विविध विकासकामांच्या उदघाटनप्रसंगी बोलत होत्या.