रामटेक: जंगलातल्या आगीच्या घटना टाळाव्यात; देवलापार प्रादेशिक चे वनपरिक्षेत्राधिकारी शेषराव टुले यांचे ग्रामवासियांना आवाहन
Ramtek, Nagpur | Mar 31, 2026 जंगलात आग लागण्याच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. तसेच मोहाफुल वेचण्याचा हंगामही सुरू झाला आहे. मागील काही दिवसात देवलापारसह अन्य वनपरिक्षेत्रात ही आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र मोहफूल वेचणाऱ्यांनी झाडाखाली आग न लावता ती लागू नये याची दक्षता घ्यावी असे आवाहन 31 मार्चला देवलापार वन्यपरिक्षेत्र प्रादेशिक चे वनपरिक्षेत्राधिकारी शेषराव टुले यांनी ग्रामवासीयांना केले आहे.