पोलीस स्मृतिदिन २०२६ | नांदेड पोलीस
कर्तव्य बजावताना देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर पोलीस हुतात्म्यांना नांदेड पोलीस दलातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 💐
दि. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी श्री गुरु गोविंदसिंघजी पोलीस क्रीडा संकुल, पोलीस मुख्यालय, नांदेड येथे आयोजित पोलीस स्मृतिदिन कार्यक्रमात हुतात्म्यांना शोक सलामी देण्यात आली, त्यांच्या नावांचे वाचन करण्यात आले तसेच हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून त्यांच्या सर्वोच्च बलिदानाला अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी पोलीस अधिकारी, अंमलदार व मान्यवर उपस्थित होते.
🫡 देशसेवेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर पोलीस हुतात्म्यांचे शौर्य आणि त्याग सदैव स्मरणात राहील.
वीर हुतात्म्यांना विनम्र अभिवादन! 🇮🇳
#NandedPolice #PoliceCommemorationDay #PoliceMartyrsDay #PoliceSmritiDin #MaharashtraPolice SaluteToMartyrs नांदेडपोलीस पोलीसस्मृतिदिन वीरहुतात्मे
24 views | Nanded, Maharashtra | Oct 22, 2026