वणी: वर्धा नदीच्या बेलोरा पुलावरून नदीत उडी घेऊन तरुणाची आत्महत्या
Wani, Yavatmal | Jan 14, 2026 वणी घुग्गुस मार्गावरील वर्धा नदीच्या बेलोरा पुलावरून नदीत उडी घेऊन तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवार दि. १४ जानेवारीला सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. महेश दशरथ देठे वय अंदाजे ३४ वर्षे रा. नायगाव (बु.) असे या आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.