नागपूर शहर: लकडगंज हद्दीत झाडीत आढळला अनोळखी तरुण; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन
लकडगंज पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वर्धमान नगर पावर हाऊस चौक परिसरातील रोडलगतच्या झाडीत अंदाजे २५ ते ३५ वयोगटातील एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे.घटनास्थळी देशी दारूची बाटली मिळून आली असून वैद्यकीय तपासणी आणि कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. नागरिक किंवा इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वरील वर्णनाशी जुळणारी कोणतीही व्यक्ती बेपत्ता असल्यास, त्यांनी तात्काळ लकडगंज पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन नागपूर पोलिसांकडून करण्यात आले