रामटेक: देवलापार येथे 125 किलोग्रॅम अवैध गांजा कार सहित जप्त ; आरोपी चालक पसार
Ramtek, Nagpur | Jun 27, 2026 जुन्या देवलापार पोलीस स्टेशन समोर शुक्रवारच्या रात्री नाकाबंदी करीत असताना देवलापार पोलिसांनी 125. 665 किलोग्रॅम वजनाचा अवैध गांजा एका कारमध्ये अवैधपणे नेतांना जप्त केला.या कारवाईत 35 लाख 13 हजार 300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारच्या रात्री 2.10 वाजता च्या दरम्यान करण्यात आली. या कारवाईत कार चालक मात्र पसार झाला.