रामटेक: रामटेक व पारशिवनी क्रीडा संकुलाचा होणार कायापालट ; राज्यमंत्री एड. आशिष जयस्वाल यांचे निर्देश
Ramtek, Nagpur | Apr 25, 2026 खेळाडूंसाठी दर्जेदार सुविधा आणि सुरक्षा भिंतीचे काम युद्ध पातळीवर करण्याचे निर्देश देत राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांनी दोन्ही मैदानाची पाहणी शनिवार दिनांक 25 एप्रिल ला केली. राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांच्या अध्यक्षतेत शनिवारला तहसीलदार रमेश कोळपे रामटेक यांचे कक्षात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची क्रीडा संकुला संबंधी बैठक आयोजित करण्यात आली होती.