रामटेक: वाहीटोला येथील मनसर माईन्सच्या वॉटर डॅम्पिंग सुरक्षा भिंतीजवळ आढळला बिबट
Ramtek, Nagpur | Jul 1, 2026 रामटेक - मनसर मार्गावरील वाहीटोला येथील मनसर माईन्स अंतर्गत मॅगनीज काढल्यानंतर उरलेल्या गड्ड्यात पाणी साचून डम्पिंग झालेले आहे. बाजूलाच सीबीएसई स्कूल निर्माणस्थ अवस्थेत आहे. या परिसराच्या सुरक्षेतेसाठी रामटेक - मनसर मार्गालगत असलेल्या सुरक्षा भिंतीजवळ मंगळवार दिनांक 30 जून च्या मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास एक बिबट लोकांनी बघितल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे. समोरच राहणारे पृथ्वीराज उदयसिंग यादव यांनी त्याला आपल्या कॅमेऱ्यात त्याला शूट केल्याने या घटनेला दुजोरा मिळाला आहे.