नागपूर ग्रामीण: मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर सरकार ठाम; बहुतांश मागण्या पूर्ण केल्याचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा दावा
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी मांडलेल्या १५ मुद्यांच्या मसुद्यावर राज्य सरकार पूर्णपणे ठाम असल्याची भूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी नागपूर येथे मांडली. सरकारच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्वच आमदारांनी जरांगे यांच्या मागण्यांसंदर्भात सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे.