विकास आयुक्त (उद्योग) यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या एमएसएई क्षेत्रावर अधिक भर देऊन त्यांची कार्यक्षमता व उत्पादकता वाढविणे, राज्यात उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करुन रोजगार, स्वयंरोजगार संधी मोठ्या प्रमाणात निर्माण करणे, एक जिल्हा एक उत्पादन उपक्रम व निर्यातवृध्दीस चालना देण्यासाठी तसेच उद्योगाच्या विकासाकरिता राज्य तसचे केंद्र शासनाचे विविध विभाग त्यांचे उपक्रम व योजना उद्योग विभागामार्फत राबविण्यात येतात. सर्व योजनांची माहिती उद्योजकांना एकाच व्यासपीठावर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनानुसार "महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन २०२६" या अंतर्गत जिल्हा नियोजन भवन येथे जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा रोजी संपन्न झाली.