आज महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेऊन राज्याच्या विकासासह आरोग्य क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली.
• दुष्काळ घोषणेबद्दल आभार: राज्यातील पावसाच्या कमतरतेमुळे प्रभावित भागांसह बुलढाणा जिल्ह्याचाही दुष्काळग्रस्त श्रेणीत समावेश करण्याच्या निर्णयाबद्दल मा.मुख्यमंत्री महोदयांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
• स्वतंत्र आयुष मंत्रालयाची स्थापना:- महाराष्ट्रात आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी या उपचारपद्धतींच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र आयुष मंत्रालय स्थापन करण्याबाबत चर्चा केली.
• आयुष विद्यापीठाची स्थापना:- राज्यातील आयुष शिक्षण, संशोधन आणि कौशल्य विकासाला नवी दिशा देण्यासाठी स्वतंत्र आयुष विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी केली.
• BMC आरोग्य सेवांच्या निर्णयांची अंमलबजावणी:- मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य आढावा बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पालिका आयुक्तांना आवश्यक निर्देश देण्याचा विषय मांडला.
जनकल्याण, जनआरोग्य आणि राज्याच्या सर्वांगीण विकासाला नव्या उंचीवर नेण्यासाठी आमचे सरकार सातत्याने संकल्पबद्ध आहे.
@devendra_fadnavis
#maharashtra #devendrafadnavi #buldhana #ayush #publichealth
129 views | Delhi, India | Sep 29, 2026