जळगाव लाईव्ह न्यूज : जळगाव सायकलिस्ट ग्रुपतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे. आज, गुरुवार दिनांक ९ जुलै रोजी सकाळी साडेपाच वाजता आकाशवाणी चौकातून या वारीने पंढरपूरकडे प्रस्थान केले. विशेष म्हणजे, जळगाव शहराच्या महापौर दीपमाला काळे यांनी स्वतः सायकल चालवत सलग दुसऱ्या वर्षी या वारीमध्ये सहभाग घेतला आहे.
#jalgaonlivenews #jalgaonlive #pandharpur #Deepmalakale