पुण्यात दारूच्या नशेत विद्यार्थ्याची भरधाव कार! 3-4 दुचाकींना धडक, नागरिकांनी केली मारहाण
पुण्यातील कोथरूड परिसरात दारूच्या नशेत भरधाव कार चालवणाऱ्या एका २४ वर्षीय विद्यार्थ्याने तीन ते चार दुचाकींना धडक दिल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्री सुमारे ८ वाजता एमआयटी कॉलेजजवळील पौड रोडवर हा प्रकार घडला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, या अपघातात तीन ते चार दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाले.
अपघातानंतर संतप्त नागरिकांनी कार अडवून चालकाला बाहेर काढले आणि त्याला मारहाण केली. त्यानंतर चालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांच्या माहितीनुसार, संबंधित तरुण एमआयटी कॉलेजचा विद्यार्थी असून सिंहगड रोड परिसरात राहतो. प्राथमिक निरीक्षणानुसार तो दारूच्या नशेत वाहन चालवत असल्याचा संशय आहे. वैद्यकीय तपासणी आणि
Pune City, Pune | Oct 16, 2026