कुही: हेटामेटी शिवारात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड
Kuhi, Nagpur | Apr 1, 2026 पोलीस स्टेशन पाचगाव अंतर्गत येत असलेल्या हेटामेटी शिवारात गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व पाचगाव पोलीस पथकाने जुगार अड्ड्यावर धाड टाकून 15 आरोपीस ताब्यात घेऊन 3 लाख 99 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची घटना घडली.15 आरोपीविरुद्ध पाचगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.