कळमेश्वर: गोंडखैरी टोल नाक्याजवळ कंटेनर मध्ये ट्रक चालकाचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ
नागपूर-अमरावती महामार्गावरील गोंडखैरी टोल नाक्याजवळ आज एका उभ्या असलेल्या कंटेनरमध्ये ट्रक चालकाचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (ट्रक क्रमांक: HR 69 D 8056). घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलीस स्टेशनचे पीएसआय मनोज शिंदे अमलदार मनीष सोनवणे आणि राम नेहारे यांनी तातडीने घटनास्थळ गाठले आणि परिस्थितीची पाहणी केली