धुळे: क्षिरे कॉलनीत बनावट सह्यांचा फायदा घेऊन सामाईक वापराच्या जागेत केले अतिक्रमण, पश्चिम देवपूर पोलिसांत एकावर गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Sep 2, 2024 धुळे शहरातील देवपूर भागातील वलवाडी शिवारात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका व्यक्तीने बनावट सह्यांचा फायदा घेऊन सामाईक वापराच्या जागेत बांधकाम केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी प्रकाश गोटूराम रणधीर यांनी दिलेल्या दिलेल्या फिर्यादीनुसार पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.