रोहा: नागोठणे जवळ महामार्गाचे काम कासवगतीने
Roha, Raigad | May 6, 2026 यावर्षी मे महिना संपण्यापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल आणि या पावसाळ्यात प्रवाशांना त्रास होणार नाही, असा शब्द केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकताच दिला आहे. मात्र, पळस्पे ते इंदापूर या 84 किमीच्या पहिल्या टप्प्यातील सद्यस्थिती पाहता, प्रशासकीय आश्वासने आणि जमिनीवरची वास्तविकता यात मोठी तफावत दिसून येत आहे.