रामटेक: रामटेक येथील कनिष्ठ अभियंता संजय पवार यांच्या आत्महत्या प्रकरणी शांततापूर्ण धरणे आंदोलन
Ramtek, Nagpur | Jul 7, 2026 जलजीवन विभाग जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत रामटेक येथील शाखेत कार्यरत कनिष्ठ अभियंता संजय पवार यांनी मागील दोन जुलैला सकाळी त्यांच्या शीतलवाडी रामटेक किरायाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणात संशय व्यक्त करण्यात येऊन प्रकरणाची निष्पक्ष सखोल व पारदर्शक चौकशी करून पीडित कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी मंगळवारला नागपूर येथे काही संघटनाद्वारे आंदोलन करण्यात आले.