नागपूर शहर: उपराजधानी पुन्हा एक झुंडबळी !9 वर्षीय चिमुकलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या नराधमाला जमावाकडून मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू
नागपूरमधील पारडी परिसरात ९ वर्षांच्या बालिकेशी अश्लील कृत्य करणाऱ्या नारायण वैष्णव (वय ३५) याला ७० ते ८० जणांच्या संतापलेल्या जमावाने घेरून बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या नारायणला मेयो रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते, जिथे उपचारादरम्यान मंगळवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला. पारडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे.आठ दिवसांत कायदा हातात घेण्याची ही दुसरी घटना घडली होती.