चिमूर: चिमूरमध्ये अल्पवयीन मुलीवरील अत्याचाऱ्याबाबत भाजप मंडळ अध्यक्षाविरुद्ध गुन्हा दाखल
चिमूरमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी भाजपच्या चिमूर मंडळ अध्यक्ष गजानन गुडधेंवर गुन्हा दाखल. पोलिसांकडून टाळाटाळ झाल्यानंतर महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या शिवानी वडेट्टीवार यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं. आरोपी अद्याप फरार असून तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली.