मा. युवा सरपंच सतीश गणपतराव बिरादार — लाडकी बहीण विवाह मदत योजना, होनाळी देवणी तालुक्यातील होनाळी येथील मा. युवा सरपंच सतीश गणपतराव बिरादार यांनी समाजहिताचा एक स्तुत्य उपक्रम राबवत, गावातील सर्व समाजातील 18 वर्षे पूर्ण केलेल्या मुलींच्या विवाहासाठी रु. 11,000/- इतकी आर्थिक मदत स्वखर्चातून देण्याची घोषणा श्री दत्त जयंती निमित्त ग्रामपंचायत कार्यालयात, बाल हक्क समितीच्या उपस्थितीत केली होती.