रामटेक: देवलापार पोलिसांनी घरफोडी च्या संदर्भात तीन आरोपींना मुद्देमालासह केली अटक
Ramtek, Nagpur | Jun 9, 2026 मागील 26 मे च्या मध्यरात्री पवनी येथील विवान मोबाईल शॉपी येथे व 23 मे च्या मध्यरात्री देवलापार येथील जैन किराणा दुकानात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली होती. या दोन्ही गुन्ह्यां च्या तपासात शोध घेऊन देवलापार पोलिसांनी आठ जूनला या गुन्ह्यातील तीन आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात यश मिळविले आहे.