हिंगणघाट: पाणी पुरवठा पाईपलाईन त्रुटीवर त्वरित न. प. ची कार्यवाही:युवा मोर्चा विधानसभा अध्यक्ष युवराज माऊस्कर मागणीच दखल
हिंगणघाट शहरातील प्रभाग क्र. १८ (इंदिरा गांधी व गोमाजी वॉर्ड) मधील अमृत योजनेअंतर्गत टाकण्यात आलेल्या पाणीपुरवठा पाइपलाइनमधील गंभीर त्रुटी आणि लिकेजच्या तक्रार भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीचे हिंगणघाट विधानसभा अध्यक्ष युवराज गजानन माऊस्कर यांनी केली होती. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी तातडीने दखल घेत संवेदनशीलता दाखवली. निवेदन मिळताच दुसऱ्याच दिवशी त्यांनी अभियंते व कर्मचाऱ्यांचे पथक सर्वेक्षणासाठी पाठवले. या सर्वेक्षणाचे मार्गदर्शन युवराज गजानन माऊस्कर केले आहे.