रॅपिडो राईडमध्ये आधीच बसला होता अनोळखी पुरुष! पुण्यातील महिलेचा धक्कादायक अनुभव, VIDEO व्हायरल
पुण्यातील आकांक्षा नावाच्या महिलेने रॅपिडो राईडदरम्यान आलेल्या संशयास्पद अनुभवाचा VIDEO सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या म्हणण्यानुसार, तिने बुक केलेल्या रॅपिडो ऑटोमध्ये एक अनोळखी पुरुष आधीच बसलेला होता.
सुरुवातीला हा प्रवासी आधीच्या राईडचा असावा, असे तिला वाटले. मात्र, तिच्या मैत्रिणीने सावध करत गाडीत न बसण्याचा सल्ला दिला. त्यानंतर ड्रायव्हरने त्या व्यक्तीला थोड्या अंतरावर सोडायचे असल्याचे सांगितले. ड्रायव्हर आणि अनोळखी व्यक्तीमधील संशयास्पद हालचाली लक्षात आल्यानंतर आकांक्षाने धोका पत्करला नाही आणि तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला, असा तिचा दावा आहे.
या पोस्टनंतर रॅपिडोने महिलेची माफी मागत हा प्रकार ‘अत्यंत चिंताजनक’ असल्याचे म्हटले आणि संबंधित राईडची माहिती मागवून ड्रायव्हरविरोधात कठोर कारवाई सुरू करण्याचे सांगितले आहे.
या घटनेमुळे ॲप-आधारित राईड-हेलिंग सेवांमध्ये महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
🚨 रॅपिडोमध्ये आधीच बसला होता अनोळखी पुरुष!
😱 महिलेने ओळखला धोका; राईडमधून निघून गेली
🎥 पुण्यातील महिलेचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
⚠️ रॅपिडोची माफी; ड्रायव्हरवर कारवाई सुरू
#Pune #Rapido #RapidoRide #WomenSafety #WomenSafetyIndia #PuneNews #ViralVideo #RideSafety #RoadSafety #BreakingNews #MaharashtraNews